Homeदेश-विदेशभारतात समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

भारतात समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

अहमदनगर,दि.१७ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार, १७ ऑक्टोबर) समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत ऐतिहासिक निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत तीन विरूद्द दोन असा हा निकाल देण्यात आला आहे.

पाच न्यायमूर्तींचं घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमुर्ती एस के कौल, न्यायमुर्ती पीएस नरसिम्हा, न्यायमुर्ती रविन्द्र भट आणि न्यायमुर्ती हिमा कोहली यांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे.

हे प्रकरण संसदेच्या अखत्यारित येत. केंद्र सरकारची समिती समलैंगिकतेच्या संदर्भात निर्णय घेईल असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. या प्रकरणात भारताचे न्यायाधीश धनजय चंद्रचूड आणि संजय किशन कौल एका बाजूने निकाल दिली, तर न्यायाधीश हिमा कोहली, जस्टीस नरिमन आणि जस्टीस नारसिमहा यांनी दुसऱ्या बाजून निकाल दिला आहे.

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशातील कलम 377 रद्द करण्यात आलं. त्यानंतर समलिंगी विवाहाना मान्यता देण्यात यावा अशी मागणी केली जात होती

या प्रकरणी देशभरातल्या 21 जोडप्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने एकत्रित सुनावणी केली होती. या विवाहांना मान्यता देण्यास केंद्र सरकारने सुनावणी दरम्यान कडाडून विरोध केला होता. यावेळी भारतीय विवाह संस्थेत अशा संबंधांना लग्नाची मान्यता संस्कृतीला धरून नाही असा दावा देखील करण्यात आला होता. समलिंगी लग्नांना कायदेशीर मान्यता दिल्याने वारसाहक्क, घटस्फोट आणि संपत्ती हस्तांतरणाचे किचकट प्रश्न उदभवतील असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान भारतात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नसल्यानं अशी जोडपी संपत्तीच्या अधिकारासह, मुल दत्तक घेणे तसेच सरकारच्या इतर अनेक महत्त्वाच्या योजनांपासून देखील वंचित राहतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!