मुंबई ,२० जानेवारी २०२३
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. आता पुढील पाच दिवसांत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र,आता उत्तरेतील पश्चिम चक्रावाताचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत म्हणजेच सोमवारपर्यंत थंडी कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. आज मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट होईल. तर, विदर्भ, कोकणासह मराठवाड्याच्या तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्याच्या कमाल तापमानातही वाढ होत आहे. राज्यभरात तापमानाचा पारा 27 ते 35 अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34.4अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. तर, आज राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमान धुळे येथे नोंदवले गेले आहे. निफाड येथे 9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. मध्य महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान 14 अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे.
औरंगाबाद 30.5 (10.6), पुणे 31.6 (10.7), जळगाव 29 (11.2), धुळे 28 (8), कोल्हापूर 31.8 (17.2), महाबळेश्वर 28.6 (13.9), नाशिक 30.1 (11.4), निफाड 29.८ (9), सांगली 31 (15.1), सातारा 32.7 (13.1), सोलापूर 34.4 (17.5), नांदेड 32.4 (17), परभणी 31.4 (14.5), अकोला 31.4 (15.5), अमरावती 30.8 (14.1), बुलडाणा 29.2 (15.2), नागपूर 28.2 (13.6)
उत्तरेतील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावर नाही.