अहमदनगर,(प्रतिनिधी) – नगर तालुका क्रीडा समितीच्या बुधवार (दि.७ ऑगस्ट) रोजी सहविचार सभेत क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली श्री भैरवनाथ विद्यालय आगडगावचे शिक्षक रवींद्र हंबर्डे यांची समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. खेळ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. प्रत्येकजण कोणता ना कोणता खेळ प्रकार पसंत करतो. काहीजण खेळाची आवड करिअरच्या दिशेनं पुढे नेतात. तर काही लोक आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना फॉलो करत खेळाचा आनंद घेतात. यावेळी हिंगे यांनी खेळाचे महत्व वरील शब्दात व्यक्त केले.
देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलाय. यात हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद, लाखो देशवासियांसाठी प्रेरणादायी असलेले व्यक्तीमत्व दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांच्यासह सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटमध्ये देवाची उपमा लाभलेल्या सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना प्रेरणा आणि आत्मविश्वास त्यांच्या प्रशिक्षकांकडून मिळाला असल्याचे मत यावेळी हंबर्डे यांनी व्यक्त केले.
यावेळी क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिघे साहेब, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे,
क्रीडा शिक्षक शिरीष टेकाडे, आप्पासाहेब शिंदे, रमाकांत दरेकर, दिपक दरेकर, मुळे,
नगर तालुका ग्राम सुधार सेवा मंडळाचे अध्यक्ष उद्धवराव दूसुंगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंके व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी रवींद्र हंबर्डे यांचे त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.