शेवगाव, (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव गुंफा येथील ज्येष्ठ पत्रकार रामकिसन माने (आर.आर माने )यांना शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेने राज्यस्तरीय संत सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. श्री क्षेत्र देवगड येथे झालेल्या गौरव महाराष्ट्राचा गुणगौरव राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिंदखेड येथील राजा लखुजी जाधवराव यांचे १४वे वंशज श्रीमंत संभाजीराव राजे जाधवराव यांच्या हस्ते व धोंडीराम सिंह राजपूत, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे सेवेकरी शिंदे मामा, शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे, उपाध्यक्ष बाबासाहेब शिरसाठ व सचिव ताईसाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराने रामकिसन माने यांना सन्मानित करण्यात आले.