Homeनगर शहरनगरमध्ये महाविकास आघाडीची ताकद दाखवणारी रॅली: अभिषेक कळमकर यांच्या प्रचाराला जनतेचा पाठिंबा

नगरमध्ये महाविकास आघाडीची ताकद दाखवणारी रॅली: अभिषेक कळमकर यांच्या प्रचाराला जनतेचा पाठिंबा

अहिल्यानगार,(प्रतिनिधी) – नगर शहरातील माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरापासून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचार फेरीला उत्साहात सुरुवात झाली. नगरच्या गजबजलेल्या रस्त्यांवरुन ही फेरी दिल्ली गेट येथील सभास्थळी पोहोचली, जिथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक प्रभावी सभा झाली. शहरातील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
सभेत अभिषेक कळमकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हा निवडणूक लढा केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून, नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. दहशतीच्या राजकारणाला आता आपण पूर्णविराम द्यायला हवा.” तसेच “घर लुटण्यासाठी नाही, ताबे मारण्यासाठी नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाच्या हक्कांची जपणूक करण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण राजकारण करत आहोत,” .

अभिषेक कळमकर यांनी, “दहा वर्षांपासून रखडलेली विकास कामे करण्यासाठी संधी द्या आणि तुतारी चिन्हाला मतदान करा,” असे नागरिकांना आवाहन केले. त्यांनी पुढे सांगितले की, “या निवडणुकीत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे, त्यामुळे नागरिकांनी या लढ्यात महाविकास आघाडीला साथ द्यावी.”
खासदार निलेश लंके यांनी सभेत उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “नगरच्या जनतेनेच आता हि निवडणूक हातात घेतली आहे. वास्तविक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल उचलायचं असेल, तर अभिषेक कळमकर यांना विजयी करणे हा एकमेव पर्याय आहे.” त्यांनी “स्व. अनिल भैय्यांना श्रद्धांजली वाहायची असेल तर जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे,” असे भावनिक आवाहन केले.

लंके यांनी नगरच्या विकासाचे आश्वासन देत पुढील दीड वर्षात आयटी पार्कच्या स्थापनेसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. “जर पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या गेल्या असत्या तर आज अंबानी देशाचे पंतप्रधान झाले असते, पण नगरमध्ये हे राजकारण शक्य नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. याचबरोबर “नगरच्या सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन अभिषेक कळमकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,” असे त्यांनी आवाहन केले.
सभेत काँग्रेसचे किरण काळे, शिवसेनेचे विक्रम राठोड, संभाजी कदम, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, प्रवीण परदेशी, ओंकार सातपुते यांसारखे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांचे मान्यवर या वेळी  उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नगरच्या सुसंस्कृततेचे दर्शन घडवणाऱ्या या सभेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. विशेषतः सुरक्षितता, रोजगार, आणि नगरच्या नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा उमेदवार निवडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. 
या प्रचार रॅलीमुळे नगर शहरात महाविकास आघाडीची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!