Homeनगर शहरठाकरे गट शिवसेनेच्यावतीने नगरमध्ये निदर्शने

ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने नगरमध्ये निदर्शने

अहमदनगर,दि.२ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – नगर शहरात शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी निदर्शने करून सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना फुलसौंदर म्हणाले जनतेचे प्रश्न लावण्यात राज्य सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. जालना येथे मराठा समाजाचे शांतपणे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या घटनेची जबाबदारी स्विकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सभापती कवडे यांनीही या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर टीका केली. यावेळी उपस्थितांनी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!