अहमदनगर,दि.१५ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी पत्रकारांची मुख्य संघटना म्हणजे अहमदनगर प्रेस क्लब होय. सध्या या संघटनेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. अनेकांना या संघटनेच्या अध्यक्षपदाचे डोहाळे लागले आहेत. अध्यक्षपदाच्या या रेस मध्ये कोण बाजी मारते हे येणाऱ्या पुढील काळात स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने सध्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
अहमदनगर प्रेस क्लबकडे सदस्यत्वासाठी आलेल्या अर्जांची छाननी समितीच्या बैठकीत आज करण्यात आली. छाननी समितीचे सदस्य म्हणून रामदास ढमाले, शिवाजी शिर्के, सुधीर लंके, अनंत पाटील, मन्सूर शेख, बाबा जाधव, संदीप रोडे, मोहीनीराज लहाडे, अशोक निंबाळकर हे उपस्थित होते. छाननी समितीने संथेच्या पोटनियमानुसार अंतिम केलेली सभासद यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
बैठकीत संस्थेचा निवडणूक कार्यक्रम अंतिम करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे –
सभासदांची मतदार यादी प्रसिद्ध करणे – दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ५ वा.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे – दि. १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ४ वाजेपर्यंत.
दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करणे – दि. २० फेबु्रवारी २०२३ रोजी सकाळी ११ वा.
छाननी नंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे – दि. २० फेब्रुवारी रोजी छाननी संपल्यानंतर लागलीच.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत- दि. २२ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजेपर्यंत.
निवडणुकीसाठी अंतिम राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे – दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.
मतदान (आवश्यकता भासल्यास) – सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दु. ४ वाजेपर्यंत.
मतमोजणी व निकाल जाहीर करणे- मतदान संपल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता.
अर्ज दाखल करण्याचे स्थळ- नगर सह्याद्री कार्यालय, माळीवाडा
या १३ जागांसाठी होणार निवडणूक प्रक्रिया –
अध्यक्ष (जागा १),
उपाध्यक्ष (जागा २),
सरचिटणीस (जागा १),
सहचिटणीस (जागा १),
खजिनदार (जागा १),
कार्यकारीणी सदस्य- (७ जागा)
एकूण जागा १३
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, खजिनदार या पदांसाठी अर्ज दाखल करणार्या उमेदवारास फक्त एकालाच सुचक आणि एकालाच अनुमोदक होता येईल. कार्यकारीणी सदस्यासाठी अर्ज दाखल करणार्या उमेदवाराला सुचक किंवा अनुमोदक होणारा हा जास्तीत जास्त जणांना सुचक अथवा अनुमोदक होऊ शकेल.
उमेदवारी अर्जाचे शुल्क – ५० रुपये. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवाजी शिर्के व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून बाबा जाधव यांची निवड करण्यात आली.