पुणे,दि.१७ जानेवारी –
पुण्यात नायलॉन मांजावर घातलेले बंदी असूनही आदेश डावलून नायलॉन मांजाने पतंग उडवण्यात आली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार दोन पोलीस जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नॉयलॉन मांजामुळे जखमी झालेल्या घटनेत पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी असे त्यांची नावे आहे. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहे.
रविवारी दुचाकीस्वार पवार आणि गवळी पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्या वेळी मांजा मानेला अडकल्याने पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्याबरोबर असलेले सहकारी गवळी यांचा हात मांजामुळे चिरला आहे.
मुंबई परिसरातील ६४ पक्ष्यांसाठी ‘संक्रांती’चा दिवस घातक ठरला आहे. मांजामुळे मुंबईत मकरसंक्रांतीच्या दिवशी ६४ पक्षी जखमी झाले आहे. अनेक पक्ष्यांचे पंख कापले तर काहींचे पाय कापले गेले आहे. जखमी पक्षांवर अम्मा केअर फाउंडेशन, प्लांट अँड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई तर्फे या पक्ष्यांवर उपचार करण्यात आले आहे.