Homeनगर जिल्हामहिलेस मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित

महिलेस मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित

चित्रा वाघ यांनी मानले सरकारचे आभार

अहमदनगर,दि.३ मार्च, (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या सुपा टोल नाक्यावर एका महिलेला पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी एका महिलेला तेही एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सदर घटना टोल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये सुद्धा कैद झाल्याने ही घटना उघडकीस आली आहे. या पोलीस अधिकाऱ्याने त्या महिलेला नेमकी का मारहाण केली? याबाबत अद्यापही काहीही खुलासा झालेला नसला तरी, पोलीस निरीक्षक गोकावे असे या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी दोषी पोलीस अधिकारी गोकावे यांना निलंबीत करण्यात आले आहे. यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरला याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “अहमदनगर जिल्हा सुपा येथील PI गोकावे याने एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली.. सदर घटनेची तात्काळ दखल राज्याचे मुख्यमंत्री @mieknathshinde जी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जीं नी या PI ला निलंबीत केले आहे. राज्यातील समस्त मातृशक्तीकडनं सरकारचे आभार.” असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरच्या व्हिडिओमध्ये लिहिले आहे.

पोलिसांची गाडी सुपा टोल नाक्यावर येऊन थांबली होती. त्या गाडीतून काहीवेळ कोणीच खाली उतरत नाही. काही वेळाने तेथे पुण्याच्या दिशेकडून आलेली एक कार थांबते. कार थांबताच पोलीस गाडीतून एक व्यक्ती खाली उतरून कारमध्ये बसते. थोड्या वेळेने ती व्यक्ती व एक महिला त्या गाडीतून उतरतात व भर रस्त्यावर त्या दोघांच्यात बराचवेळ झटापट होते. याकाळात ती महिला व तो व्यक्ती बोलतात व त्यांच्यात चांगलीच बाचावाची होऊन महिलेला मारहाण होत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, सदरची महिला कोण? याची वेगवेगळी चर्चा पोलीस दलात सध्या सुरु आहे. त्या महिलेला भर रस्त्यात मारहाण करण्याचे कारण काय? याबद्दलची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!