Homeनगर शहरनगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, म्हणाले...

नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, म्हणाले…

अहमदनगर,दि.६ जून २०२३,(प्रतिनिधी) – अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आहे.

हे सहन केले जाणार नाही, जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी रात्री फकिरवाडा परिसरात हजरत दमबाहरी हजरत यांच्या उर्स निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबचे पोस्टर झळकविल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील मुकुंदनगर परिसरातून चादर अर्पण करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही जण औरंगजेबचा फोटो असलेले फलक घेऊन नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

भाजपचे आमदार नीतेश राणे म्हणाले, ‘राज्यात काही भागात अशा प्रकारच्या जिहादी विचारांचे लोक आहे. ते पाकिस्तानच्याही घोषणा देतात. पण त्यांनी लक्षात घ्यावे की आता महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे यापुढे असे प्रकार चालणार नाहीत. ते परत अशी हिमंत करणार नाहीत, अशी काळजी आम्ही घेऊ,’ असे राणे म्हणाले.

याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी सचिन नवनाथ धोंडे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, फकीरवाडा परिसरात रविवारी (दि.४) रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास दम बारा हजारी दर्ग्याजवळ निघालेल्या सदंल उरुस मिरवणुकीमध्ये यातील आरोपी यांनी संगनमताने मुगल सम्राट औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक हातामध्ये घेऊन प्रदर्शन करुन ‘बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होऊन, द्वेष पसरेल असे कृत्य केले आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार, अफनान आदिल शेख उर्फ खडा, शेख सरवर, जावेद शेख उर्फ गब्बर यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ५०५ (२), २९८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!