मुंबई, १४ मे २०२३ – अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चड्डा यांचा आज साखर पुडा पार पडला आहे. आज अखेर या दोघांनी त्यांच्या नात्याला नाव दिलं आहे. राघव चड्डा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी अखेर शनिवारी (१३ मे) रोजी दिल्लीतील कपूरथला हाउस येथे साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून गोड फोटोही शेअर केले आहे. फोटोंमध्ये दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे.
दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट सोहळा पार पडला. या सोहळ्यात दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. या सोहळ्याला प्रियंका चोप्रा जोनासचाही उपस्थित होते. प्रियांका चोप्रा जोनास ही परिणीतीची बहीण आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या समारंभाला उपस्थिती लावली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे त्यांच्या पत्नीसोबत समारंभात उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेही या साखरपुड्याला उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी देखील या जोडप्याला आशिर्वाद दिले आहेत.