अहमदनगर,दि.२४ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवार च्या वतीने सहज भुवन, गोविंदपुरा, अहमदनगर येथे प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे महानिर्वाण दिनानिमित्त परम चैतन्य पूजा घेण्यात आली. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक सहजयोगी उपस्थित होते. पूजेच्या सुरुवातीस तीन महामंत्र घेऊन संतुलन करण्यात आले व त्यानंतर भजनाद्वारे सहजयोग्यानी माताजींच्या चरणावर फुले अर्पण करून कॅण्डल लावण्यात आले. शेवटी आरती करून पूजेची सांगता करण्यात आली. सर्व युवशक्तींनी पूजा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
For News and Advertisement:
Contact :
Baldev Bhingardive
Email = nagarsanchar@gmail.com