अहमदनगर,दि.६ जानेवारी,(प्रतिनिधी) – मराठी पत्रकार परिषद, मंबई आणि नगरमधील विविध पत्रकार संघटनांतर्फे शुक्रवार (दि. 6 जानेवारी) रोजी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4.30 वाजता शनिगल्ली, झेंडीगेट येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख व दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी दिली. मराठी पत्रकार परिषद, अहमदनगर जिल्हा, डिजिटल मीडिया परिषद अहमदनगर, शहर पत्रकार समन्वय समिती, केडगाव प्रेस क्लब, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया असोसिएशन, प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ, अहमदनगर जिल्हा जाहिरातदार संघटना तसेच शहरातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या वतीने या सर्वसमावेशक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांचा यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्व माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख यांनी केले आहे.
