आष्टी,दि.१९ जानेवारी,(प्रतिनिधी) – गेल्या दोन वर्षापासून घटसर्प, खूरकुत, लंम्पी तीन आजाराने आष्टी तालुक्यातील पशुपालकांना अतिशय त्रस्त केले आहे. या सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो की प्रत्येक जनावराच्या उपचारादरम्यान ज्याप्रमाणे माणसाच्या उपचारासाठी प्रत्येक वेळी नवीन सुई वापरले जाते. त्याप्रमाणेच जनावरांच्या उपचाराला देखील प्रत्येक वेळी नवीन सुई वापर करावा. एक सुई – एक लसीकरण, एक सुई – एक उपचार ही मोहीम शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आपल्या पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व संसर्ग आजार रोखण्यासाठी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविवावी असे आवाहन शेतकऱ्यांना आ.सुरेश धस यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती व खाजगी पशुसेवा संघटना आष्टी तालुका यांच्या संयुक्तविद्यमाने एक सुई-एक लसीकरण, एक सुई – एक उपचार ही मोहीमेच्या जनजागृती अभियानात आमदार सुरेश धस बोलत होते.
यावेळी पुढे आमदार सुरेश धस म्हणाले की, ही मोहीम डॉक्टराबरोबर शेतकऱ्यांनी देखील याची दखल घेत डॉक्टर आपल्याकडे ज्यावेळेस जनावरांच्या उपचारासाठी येतो त्यावेळेस डॉक्टरांना स्पष्टपणे नवीन सुईची वापर करण्याची विनंती शेतकऱ्यांनी करावी. जर इंजेक्शनला देखील बाधा असेल तर सुई बरोबर इंजेक्शन देखील नवीन वापरण्याची विनंती करावी.या प्रकारामुळे आपल्या तालुक्यात जनावरांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत डॉक्टराबरोबर शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करत जागृत व्हावे असेही आवाहन आमदार सुरेश धस यांनी शेवटी केले आहे. यावेळी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डाॕ.मंगेश ढेरे, डॉ.जालींदर वांढरे, डॉ.सोमनाथ पोकळे डॉ.चटाले यांच्यासह खाजगी पशुसेवा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.