मुंबई,दि.१ मे २०२३,(ऑनलाईन वृत्त) –
आता ‘घटस्फोटासाठी ६ महिने थांबण्याची गरज नाही आहे. सर्वाच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. नातेसंबंध सुधारण्याची शक्यता नसल्यास संविधानाच्या अनुच्छेद 142 च्या तरतुदींचा वापर करून दाम्पत्य घटस्फोट घेऊ शकते. त्यासाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही. असा ऐतिहासिक निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे कौटुंबिक ताणतणावातून जात असलेल्या दाम्पत्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या कायद्यानुसार पती-पत्नी घटस्फोटासाठी राजी असेल तर फॅमिली कोर्टाकडून या दोन्ही पक्षाला विचार करण्यासाठी आणि संबंधात सुधारणा करण्यासाठी सहा महिन्याचा वेळ दिला जातो. त्यामुळे अनेकांना घटस्फोटासाठी सहा महिने थांबावे लागते. तर काहींचा सहा महिन्यात घटस्फोट घेण्याचा विचार बदलतो.
मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. सहा महिन्यानंतर आणि त्यानंतरही नातेसंबंधात सुधारणा होत नसेल तर सहा महिने थांबण्याची गरज नाही. दाम्पत्य लवकर घटस्फोट घेऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
आता हा निर्णय देताना न्यायालयाने कोणत्याही बंधनाशिवाय पूर्ण न्याय करण्याचा कोर्टाला अधिकार आहे यात कोणतीच शंका नाही. त्यामुळेच नात्यात कधीही सुधारणा न होऊ शकत नसेल तर घटस्फोट देणं कोर्टालाही शक्य आहे, असे म्हणले आहे.
‘घटस्फोटासाठी ६ महिने थांबण्याची गरज नाही’…सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय?
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on