Homeदेश-विदेशNIA ची देशातील 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी

NIA ची देशातील 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी




मुंबई, १७ मे २०२३ – राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने देशातील सहा तर राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहे. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहे.

एनआयएने बुधवारी दहशतवाद, अंमली पदार्थ तस्कर आणि गँगस्टरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमधील 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहे. शिख फॉर जस्टिस या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीच्या साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात येत आहे.

लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीतील सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून हा छापा टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या छाप्यात एनआयएने 70 हून अधिक मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलमध्ये ड्रग नेक्सस आणि लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीशी संबंधित लोकांची अनेक गुपिते समोर आली होती.

परदेशात बसलेले गुंड खलिस्तानी फुटीरतावाद्यांना निधी देऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. 100 पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे 200 हून अधिक सदस्य सहभागी झाले आहे. जसविंदर सिंग मुलतानी हा SFJ संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते आणि तो फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!