अहमदनगर,दि.१४ फेब्रुवारी,(अशोक बडे) – अहमनगर शहरामध्ये नव्यानेच झालेल्या फ्लाय ओव्हर खाली सुरुवातीला चांगल्या प्रतीचा रस्ता तयार केला होता. फ्लाय ओव्हर झाल्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती. कुठेही अपघात घडत नव्हते.
पण अचानक प्रशासनाने एका रात्रीतून फ्लाय ओव्हर खाली ठिकठिकाणी अनावश्यक ठिकाणी ट्रीपल लाईन गतिरोधक टाकले आहेत. एखाद्या गल्लीत ज्या प्रकारे बांध घातले जातात तश्याच दर्जाचे बांध राष्ट्रीय महामार्गावर घातलेले आहेत असेच म्हणावे लागेल. अहमदनगर महापालिका अश्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते.
सर्व ठिकाणी सिग्नल असताना असल्या थातुर – मातुर गतिरोधकांची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. झेब्रा क्रॉसिंग, मुख्य रस्ता आणि गती रोधक यात खूप अंतर असल्याने गतिरोधक ओलांडल्यानंतर वाहने पाहिजे तेवढा स्पीड घेतात त्यामुळे ही गतिरोधक बिनकामाची आहेत. या गतिरोधकावरती रिफ्लेक्टरसुद्धा नाहीत. त्यामुळे रात्री आणि दिवसासुद्द्धा मोठ्या प्रमाणावर गतिरोधका मुळे अपघातांची मालिका वाढली आहे.