अहमदनगर,दि.१३ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुलच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उदघाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी पं. दीनदयाळ पतसंस्थाचे संस्थापक वसंतजी लोढा, मनपा सभापती कुमार वाकळे, नगरसेवक मदन आडाव, डॉ. सागर बोरुडे, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा, तिसगाव ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक गिताराम वाघ, करंजी येथील डॉ. चंद्रशेखर अकोलकर, बुद्धिजीवी संस्थेचे संस्थापक सुनील घोडेराव, संस्थेचे चेअरमन श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष चंद्रकांत रोहोकले, सचिव लक्ष्मीकांत पारगावकर, खजिनदार संदीप गांगर्डे आदी उपस्थित होते.
या वेळी उदघाटन प्रसंगी बोलतांना आ. जगताप म्हणाले आजच्या परिस्थिती मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा चालवणे अवघड आहे. तरी सुद्धा अत्यंत अल्प फी मध्ये ही शाळा चालू असून ही कौतुकास्पद गोष्ट आहे. शिक्षणा बरोबरच सहजयोग ध्यान साधना करून घेतात ही विदयार्थ्यांचे भविष्याचे दृष्टीने महत्वाचे असून विदयार्थ्यांकडून सहजयोग ध्यान करून घेणे काळाची गरज आहे.
या वेळी पं. दीनदयाळ पतसंस्था चे संस्थापक वसंतजी लोढा म्हणाले या भागामध्ये या शाळेने शिक्षण बरोबर अध्यात्मिक शिक्षण देण्याचे पुण्याचे कार्य करीत असून इतक्या मोठया प्रमाणात पालक वर्गाची उपस्थिती म्हणजे शाळेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे पुरावा आहे. सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी शाळा स्थापना मागचे उद्देश सांगून शाळा ही सामाजिक बांधिलकीचे तत्वावर चालविले जात असून या मागे कोणताही स्वार्थ नाही. प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे शिकवणानुसार कार्य चालू आहे.
या वेळी नगरसेवक सागर बोरुडे, मदन आडाव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेचे वतीने या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. संगीता , आदर्श विदयार्थी पुरस्कार कु. वैष्णवी वामन, कु. आदेश साळवी यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपाली हजारे व शुभम भालदंड यांनी केले. स्वागत संदीप ठोंबरे यांनी मानले तर आभार प्रदर्शन डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कोषध्यक्ष संदीप गांगड्रे,प्रिन्सिपल सौ. दीपिका कदम, सौ. आचल नेटके, सौ. संगीता गांगर्डे, रुपाली जोशी, वैशाली नजन, राणी उगले, शुभम भालदंड व प्रवीण वाघमारे यांनी परिश्रम घेतले.