Homeनगर शहरशैक्षणिक शिक्षणा बरोबरच अध्यात्मिक शिक्षण देणे गरजेचे - अभय आगरकर

शैक्षणिक शिक्षणा बरोबरच अध्यात्मिक शिक्षण देणे गरजेचे – अभय आगरकर

किड्स सेकंड होम स्कुल चे सन 2025 चे दिनदर्शिका प्रकाशन

अहिल्यानगर,(प्रतिनिधी) – प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल च्या वतीने सन 2025 चे दिनदर्शिका चे प्रकाशन श्री विशाल गणेश मंदिराचे अध्यक्ष व भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर, मंदिराचे मुख्य पुजारी संगमनाथ महाराज, शहर सहकारी बँकेचे संचालक अशोक कानडे, विश्व निर्मल फौंडेशन शैक्षणिक संस्थे चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, भिंगार बँकेचे संचालक कैलास खरपूडे, उपाध्यक्ष चंद्रकांत रोहकले, अमित बुरा, शुभम भालदंड, संस्थेचे कोशाध्यक्ष संदीप गांगर्डे व बन्सी महाराज आदी उपस्थित होते.

या वेळी दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी बोलतांना अभय आगरकर म्हणाले शैक्षणिक संस्थेत दिलेले शिक्षण हा विदयार्थ्यांचा पाया असतो व पाया मजबूत झाला तर पुढे मुलांचे भविष्य उज्वल घडते या साठी विदयार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणा बरोबरच आध्यत्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी संस्थे बाबत माहिती देतांना सांगितले की, संस्थेचे कार्य अत्यंत उत्तम रित्या सुरु असून 250 पेक्षा जास्त विदयार्थी शिक्षण घेत असून विदयार्थ्यांना त्यांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी ध्यान साधनेचे धडे ही दिली जातात. शेवटी संदीप गांगर्डे यांनी आभार मानले व स्वागत चंद्रकांत रोहकले यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!