जामखेड,दि.२२ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यांतील नायगावचे ग्रामदैवत श्री.नाथ महाराज यात्रा निमित्त लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी व गावकऱ्यांसाठी नायगाव ग्रामपंचायत सदस्या संध्या सोनवणे याच्या वतीने नायगाव महोत्सवचे आयोजन केले होते. महाराष्ट्राची लावणी साम्राटणी सुरेखा पुणेकर व पाव्हण जेवलात काय गाण्याचे फेम राधा खुडे यांच्या लावणीचा व गायन नृत्य मैफिलीचा अनोखा महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन करून व दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
कार्यक्रमास महिला व पुरुष हजारोंचा संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, खर्डा पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रकाश पाटील, सचिन गायवळ, रमेश आजबे, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय काका काशीद, संजय बापू बेरड, शिरूर चे सरपंच गौतम उतेकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुरज काळे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी नेते प्रसाद दादा कर्नावट, भाजपा युवा नेते वैभव कारले, गणेश घाईतडक, सचिन काका आजबे आदीसह नायगाव ग्रामस्थ व पंचक्रोशी मधील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. अयोजक संध्या सोनवणे यांचा नायगाव ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांचा वतीने सत्कार केला.