मुंबई,२० जानेवारी २०२३-
नागपूर हादरले आहे. महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्यांतर्गत सुरेवानी गावात ही घटना घडली आहे. तीनही आरोपींना पोलिसांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. महिला शेतात एकटी असल्याचे पाहून तीन नराधम तिच्याकडे गेले आहे. जवळपास कुणी नाही हे पाहून तिघांनी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. मात्र महिनेने नकार दिल्यानंतर तिघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे.
बलात्कार करूनही नराधमांनी महिलेवर कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्यांची तिची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. मृत्यू झाल्यावरही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. नागपूर पोलीस अधिक तपास करत आहे.
नागपूर हादरलं! महिलेवर अत्याचार करत कुऱ्हाडीने केले वार
Recent Comments
Hello world!
on