Homeनगर जिल्हामराठी पत्रकार परिषदेची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर

मराठी पत्रकार परिषदेची नगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर

अहमदनगर,दि.२९ डिसेंबर,(प्रतिनिधी) – मराठी पत्रकार परिषदेच्या नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. परिषदेच्या वरिष्ठांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सूर्यकांत नेटके यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या आहेत.
पत्रकारांच्या हितासाठी सर्वप्रथम स्थापन झालेल्या आणि सुमारे 85 वर्षाचा इतिहास असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा विस्तार होत आहे. पत्रकारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी परिषद कायम अग्रही असून पाठपुरावा करत आहे.

नगर जिल्ह्याचा विस्तार पाहता दक्षिण व उत्तर असे दोन भाग करत नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहे. नव्याने कऱण्यात आलेल्या कार्यकारीणीत अनेक मान्यवर पत्रकारांना सोबत घेतले आहे. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, राज्यसचिव मन्सूरभाई शेख, नाशिक विभागाचे अध्यक्ष रोहिदास हाके, राज्य संपर्कप्रमुख अनिल महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांनी नवीन पदाधिकारी निवडीला मान्यता देत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले असल्याचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी सांगितले.

नव्याने नियुक्त करण्यात आलेली मराठी पत्रकार परिषदेची नगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी पुढील प्रमाणे:- जिल्हा उपाध्यक्ष- अमोल गव्हाणे (श्रीगोंदा), अनिल साठे (पाथर्डी), जिल्हा सरचिटणीस- महादेव दळे, जिल्हा सह-सरचिटणीस-  अशोक निमोणकर (जामखेड), कायदेशीर सल्लागार- अ‍ॅड. शिवाजी कराळे (नगर), प्रदेश प्रतिनिधी- रमेश चौधरी (शेवगाव), जिल्हा संपर्कप्रमुख- देवीदास आबुज (पारनेर), कोषाध्यक्ष- अमर छत्तीशे (शेवगाव), प्रसिद्धी प्रमुख- वाजिद शेख (नगर), रामेश्‍वर तांबे (शेवगाव),
जिल्हा कार्यकारणी सदस्य- मच्छिंद्र अनारसे (कर्जत), कैलास बुधवंत (शेवगाव), शरद शिंदे (श्रीगोंदा), समीर दाणी (नगर), डॉ. सूर्यकांत वरकड (नगर), रावसाहेब मरकड (शेवगाव), दत्ता उकिर्डे (कर्जत), केशव चेमटे (पारनेर), विलास मुखेकर (पाथर्डी), भाऊसाहेब काळोखे (नगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरमधील सर्व दैनिकांचे संपादक परिषदेचे मार्गदर्शक व सल्लागार असतील. लवकरच नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यातील पदाधिकारी, सभासद पत्रकारांसाठी मागदर्शन कार्यशाळा व मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती नेटके यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!