सोशल मीडियावर नगरकरांनी शेअर केले फोटो
अहमदनगर,दि.३० जानेवारी,(प्रतिनिधी) – आज सकाळी नगर शहर आणि परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात धुके असल्याचे नागरिकांना पहायला मिळाले. अनेक हौशी नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात सध्या थंडी खूप वाढली आहे.
त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. त्याचबरोबर नगर शहरात आज मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचं चित्र दिसत आहे. सकाळच्या वेळेला सध्या मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नगर शहर आणि परिसरातील अनेक गावं धुक्यात हरवून गेली आहेत. दुपारच्या वेळेला कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी मात्र हवेत गारवा अशा प्रकारचं वातावरण सध्या नगरमध्ये अनुभवायला मिळत आहे.