Homeक्रीडामुंबई इंडियन्सला फक्त जिंकून चालणार नाही..

मुंबई इंडियन्सला फक्त जिंकून चालणार नाही..

मुंबई,दि.२१ मे २०२३,(ऑनलाईन प्रतिनिधी) – आयपीएल २०२३ आता शेवटच्या टप्प्याकडे वळत आहे आणि हा रोमांचदेखील तितकाच शिगेला पोहोचला आहे. ग्रुप स्टेजमधील सामने संपणार आहेत पण प्लेऑफची गाठ शेवटच्या सामन्यापर्यंत कायम आहे. त्यापैकी एक सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आहे. हा सामना आज २१ मे रोजी वानखेडे मैदानावर होणार आहे. या सामन्यातील प्लेऑफच्या तिकिटाशी सनरायझर्सचा काहीही संबंध नसला तरी मुंबई इंडियन्ससाठी हा सामना करो या मरो असाच असणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एकमेकांचे रेकॉर्ड बघितले तर त्यात मुंबईचा वरचष्मा आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत २० सामने झाले असून त्यापैकी ११ वेळा मुंबई संघाने विजय मिळवला आहे. तर हैदराबादच्या संघाला केवळ ९ वेळा सामना जिंकता आला.

मुंबई संघ सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादविरुद्धचा सामना जिंकून मुंबईला १६ गुण मिळवता येतील. वास्तविक, आरसीबीचे सध्या १४ गुण आहेत, बेंगळुरू देखील संध्याकाळी शेवटचा सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात विजय तर महत्त्वाचा आहेच, पण विजयाबरोबरच रोहित अँड कंपनीला मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. नेट रन रेटवरही आज मुंबईला धमाका करावा लागणार आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात फलंदाजांची स्फोटक शैली पाहायला मिळणे अपेक्षित आहे. नेट रन रेटच्या बाबतीत रोहित आणि कंपनी आरसीबीपेक्षा मागे राहिल्याने मुंबईसाठी धोका आहे. अशा स्थितीत मुंबईला केवळ सामनाच नाही तर नेट रन रेट ही काळजी घ्यावी लागणार आहे.


महत्वाच्या बातम्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!