कोलकात्ता,दि.२५ जानेवारी –
कोलकाता न्यायालयाने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँला पोटगी महिन्याला १ लाख ३० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. १ लाख ३० हजार रुपयांपैकी ५० हजार रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक पोटगी असेल आणि उर्वरित ८० हजार त्यांच्या मुलीच्या देखभालीसाठी असतील. २०१८ मध्ये हसीन जहाँने महिन्याला १० लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती.