जगदंब फाउंडेशनचा उपक्रम
अहमदनगर,दि.२५ जानेवारी,(प्रतिनिधी) – आज काल घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. लग्नासाठी, स्थळासाठी सर्वांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे लग्न जमविणे व लग्न टिकविणे हा प्रश्न गंभीर स्वरुपात वाढलेला आहे. या प्रश्नाकडे समाजाचेही दुर्लक्ष आहे. त्यासाठी जगदंब फाउंडेशन संचलित मराठी सोयरीक संस्थेने आयोजित केलेल्या मोफत मराठा वधू वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांनी केले आहे.
येत्या रविवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘यश मंगल कार्यालय’ नेवासा फाटा, नेवासा या ठिकाणी राज्यस्तरीय ६६ वा भव्य मोफत मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. मराठी सोयरीक संस्था ही महाराष्ट्रातील नावाजलेली विश्वास पात्र संस्था आहे. तसेच जगदंब फाउंडेशन व अशोक कुटे सरांच्या टीमचे सामाजिक कार्य देखील फार चांगले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील सर्व क्षेत्रातील स्थळे या ठिकाणी बघायला मिळतील. तसेच विधवा, विदुर, घटस्फोटीत यांना देखील स्थळे बघायला मिळतील. म्हणून पुनर्विवाह करण्यासाठी त्यांनी देखील मेळाव्याला जरूर उपस्थित राहावे. स्वतः वधू वरांनी फोटो बायोडाटा घेऊन हजर राहणे गरजेचे आहे, अशी माहिती यश मंगल कार्यालयाचे संचालक डॉ. मुकुंद हारदे, जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिवाजी लंघे, मराठा सेवा संघ नेवासा तालुका अध्यक्ष रावसाहेब घुमरे, संचालिका जयश्री कुटे, संचालिका अंजना पठारे, सोमनाथ गायकवाड, सुनील शिंदे, नानासाहेब दानवे, चंद्रकांत काळे, रमेश सावंत व मराठा सोयरीकच्या सर्व मार्गदर्शक सदस्य यांनी केले आहे.