Homeक्रीडामहाराष्ट्र दिव्यांग खेळाडूंचा दिल्लीत डंका

महाराष्ट्र दिव्यांग खेळाडूंचा दिल्लीत डंका

अहमदनगर,दि.११ जानेवारी,(प्रतिनिधी) – पाचव्या राष्ट्रीय दिव्यांगजन क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या कामगिरीची छाप सोडली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी तब्बल 20 सुवर्ण, 18 रौप्य आणि 7 कास्य पदक पटकाविले. नुकतेच दोन दिवसीय एटीटीएफच्या वतीने जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली येथे ही स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील विविध राज्यांच्या दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील दिव्यांग खेळाडू मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या संघात एकूण 26 दिव्यांग खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंनी एकानंतर एक सुवर्ण पदकाची कमाई करुन दिल्लीत सुवर्ण इतिहास रचला.

पाचव्या राष्ट्रीय दिव्यांगजन क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघातील खेळाडूंची कामगिरी पुढील प्रमाणे:- सुहास मोरे- 2 सुवर्ण (गोळाफेक, थाळी फेक), अतुल धनवडे – सुवर्ण व रौप्य (थाळीफेक, गोळाफेक), अशोक भोईर- सुवर्ण व रौप्य (गोळाफेक व थाळीफेक), सुनीता भोये- 2 सुवर्ण (गोलाफेक, थाळीफेक), प्रशांत सावंत- 2 सुवर्ण (गोलाफेक, थाळीफेक), मीना पिंगाने- 2 रौप्य (गोलाफेक, थाळीफेक), पुष्पा गिरी- कास्य (थाळीफेक), सागर ऐंनकर – सुवर्ण (थाळीफेक), प्रभाकर पाटील – रौप्य (थाळीफेक), जना टोपले – 2 सुवर्ण (गोलाफेक, थाळीफेक), प्रिया पाटिल – 2 रौप्य (गोलाफेक, थाळीफेक), विरेंद्र राठोड- 2 रौप्य (गोलाफेक, थाळीफेक), महेश चांदणे- सुवर्ण व रौप्य (थाळीफेक, गोळाफेक), हर्षद चव्हाण- सुवर्ण  व रौप्य (गोळाफेक, थाळीफेक), दिपक होडगे- कांस्य व रौप्य (थाळीफेक, भालाफेक), अस्मिता कवारे- रौप्य व सुवर्ण (गोळाफेक, थाळीफेक), मंगल गांजवे- सुवर्ण व रौप्य (गोळफेक, थाळीफेक), चांगदेव शिरतर- सुवर्ण व रौप्य (गोळफेक, लांबउडी),  विकास अनुटे- रौप्य व सुवर्ण (गोळाफेक, लांबउडी), जगदीश शिंगाडी- कास्य व सुवर्ण (गोळाफेक, भालाफेक), जनार्दन पवार- कास्य (गोळाफेक), खंडू कोटकर- कास्य (लांबउडी), रोहित गाडवे- 2 सुवर्ण (लांब उडी, भालाफेक), मारुती चौगुले- रौप्य (लांबउडी), बंडू तळीखेडकर- रौप्य (भालाफेक), निलेश सांगणे- 2 कांस्य (गोळाफेक, भालाफेक).

या सर्व विजेत्या खेळाडूंना एशियन चॅम्पियन खेळाडू (सन 1992) डॉ. सुनीता गोदारा यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. विजय खेळाडूंची कंबोडिया या देशात होणार्‍या पॅरालिम्पिक गेम साठी निवड झाली आहे. सदर महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूना एटीटीएफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सुहास मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तर अतुल धनवडे यांनी टीम मॅनेजरचे काम पाहिले. नारायण मडके, प्रशांत सावंत यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!