Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, सात टप्प्यात होणार मतदान

लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, सात टप्प्यात होणार मतदान

अहमदनगर,(प्रतिनिधी) – लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. देशात ७ टप्प्यांत निवडणूक होईल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होवून ४ रोजी निकाल लागेल. ४ राज्यांमधील २६ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका  होणार आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार असून १९ एप्रिलला पहिला टप्पा, २६ एप्रिलला दुसरा टप्पा, ७ मे रोजी तिसरा टप्पा, १३ मे रोजी चौथा टप्पा तर २० मे रोजी पाचवा आणि अखेरच्या टप्प्यात मतदान होईल.

टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा)
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)
टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)
टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)
टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)
टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)
टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)
मतमोजणी :- ४ जून २०२४

निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही लागू झालेली आहे. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली आहेत, असा दावा आयोगाने केला आहे. या वेळी लोकसभा निवडणुकीत देशातील सुमारे ९७ कोटी मतदार हक्क बजावणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!