अहमदनगर,दि.२० मार्च,(प्रतिनिधी) – येथील डाव्या चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते, जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे आरटीआय विषयक मानद व्याख्याते विठ्ठल बुलबुले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले.
बुलबुले हे राष्ट्र सेवादल शाखेत सेवादल सैनिक कार्यरत होते. त्याच बरोबर माहिती अधिकार या विषयात केलेली लोक जागृती, भारत माझा देश आहे ही याबाबतची त्यांची व्याख्याने अधिक प्रचलित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक छोटासा अपघात झाला होता. त्यांची प्रकृती तेव्हापासून खराब होती असे सांगितले जात आहे.