Homeनगर शहरनगरच्या उड्डाणपुलावर अपघातात वकिलाचा मृत्यू

नगरच्या उड्डाणपुलावर अपघातात वकिलाचा मृत्यू

अहमदनगर,दि.२० जानेवारी,(प्रतिनिधी) – नगर शहरातील उड्डाणपुलावर अखेर अपघात होऊन त्यात पहिला बळी गेल्याची घटना आज घडली आहे. लेबर कोर्ट येथे प्रॅक्टीस करणारे अहमदनगर बार असोसिएशनचे सन्माननीय सदस्य ॲड. अनिरुद्ध रामचंद्र टाक (वय ४६) यांचे नगर शहरातील उड्डाणपूलावर वाहनाची धडक बसून अपघाती निधन झाले. दुचाकीच्या अपघातात पुलावरील वळणावर आज रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. हा पूल झाल्यापासून त्यावर छोटे मोठे अपघात होत आहेत.

ॲड.टाक आपल्या दुचाकीवरून जात होते. एक वाहन त्यांना धडक देऊन निघून गेले.
घटनास्थळी पोहचलेले घरघर लंगर सेवेचे प्रमुख, हरजीतसिंग वधवा यांनी पोलिसांना फोन केला. त्यांच्या खिशातील व्हिजिटिंग कार्ड वरून त्यांची ओळख पटली. ते एकटेच प्रवास करीत होते. त्यांच्या मोबाईल मधील नंबर शोधून हरजीतसिंह आणि पोलीस यांनी टाक यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. टाक यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेलेले असून टाक एकटेच घरी होते. त्यामुळे अन्य नातेवाईक तेथे आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. ॲड. टाक अहमदनगरच्या कामगार न्यायालयात वकिली करत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!