Homeकुतूहलजाणून घ्या, भोगी का साजरी केली जाते..

जाणून घ्या, भोगी का साजरी केली जाते..

अहमदनगर,दि.१४ जानेवारी,(प्रतिनिधी) – मकर संक्रांत आली की स्त्रियांना मकर संक्रांतीच्या आद्ल्यादिवशीची आतुरता असते. मकरसंक्रांतीसाठी स्त्रिया खूप दिवस आधीच तयारी सुरु करतात. मकर संक्रांतीच्या आधी येते ती म्हणजे भोगी. आणि भोगी हि एक विशिष्ट पद्धतीने साजरी केली जाते.

भोगी हा इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो. या दिवशी विविध पद्धतीत हा सण साजरा केला जातो. या दिवशी पाण्यात तीळ टाकून अंघोळ केली जाते. शरीरात उष्णता टिकून राहावी आणि येणार उन्हाळा सुखमय जावा म्हणून हि अंघोळ केली जाते. भोगी हा दिवस शुभ मानला जातो. पंजाबी समुदायात या दिवशी लोहारी साजरी केली जाते.

हिवाळा सुरु झाला कि सर्व प्रकारच्या भाज्या आहारात उपलब्ध होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला वाव मिळतो. मग भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात लोक भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता घेऊन पुन्हा मराठी माणूस काम करण्यास सज्ज होतो. नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. या सणाला प्रांतानुसार वेगवेगळी नाव आहेत. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल तर आसाम मध्ये ‘भोगली बिहू’ (Bhogli Bihu), पंजाबमध्ये ‘लोहरी’ (lohri), राजस्थानमध्ये ‘उत्तरायन’ (Uttarayan) म्हणून साजरा केला जातो.

या दिनाला एक विशेष महत्व आहे. नवीन वर्षात माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व गोडवा यावे, असा हेतू या सणाच्या मागे असतो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. विशेषकरुन पंजाबी सामुदायात मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ‘लोहरी’ (lohri) हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती (Tilua Sankranti) व पिष्टक संक्रांती (Pishtak Sankranti) असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगल (Pongal) नावाचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!