Homeमहाराष्ट्रदेशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज, जाणून घ्या

देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज, जाणून घ्या



नवी दिल्ली, २६ मे २०२३ – भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दल अंदाज व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरी 96 टक्के संपूर्ण देशात कोसळण्याची शक्यता आहे. देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे.

यंदाच्या हंगामात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!