अहमदनगर, २६ मे २०२३ – राधाकृष्ण विखे यांनी टीका केली आहे. “विरोधकांच्या मोट बांधणीला काही अर्थ नाही ते सत्तेसाठी एकत्र आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात प्रतिमा उंचावत चालली आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. त्यांना आपले स्वतःचे दुकाने बंद होण्याची भीती वाटत आहे म्हणून ते एकत्र येत आहे. नाहीतर अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांविषयी काय उद्गार काढले आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी काय उद्गार काढले आहेत ते जरा तपासा. त्यामुळे बाहेरुन कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा चालला आहे. अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये बोलत असताना केली आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सामनामधून टीका करण्यात आली की विरोधकांची नावे या निमंत्रण पत्रिकेत यायला हवी होती. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, त्यांची ही टीका व्यक्तीदोषातून करण्यात आलेले आहे. जगामध्ये भारत हा समृद्ध आणि ताकदवान देश म्हणून पुढे येत आहे. त्यातच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे जगाने स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते संसदेचे उद्घाटन होत असताना विरोधकांना पोटशूळ का उठला आहे? एक आदिवासी महिलेने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दाखल केली होती त्यावेळी विरोधकांनी त्यांना सहकार्य का केलं नाही असाही सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
जागावाटपावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. जागा वाटपावरुन दोन गटांमध्ये मतभेद असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे यांनी आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. जरी एखाद्या पक्षाचा नेता जागा वाटपाबाबत बोलत असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.
बाहेरुन कीर्तन आतून तमाशा, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on