रंगमंच, कॅमेरा व्यक्तीमत्व घडवतो – मायरा वयकुल
अहमदनगर,दि.३१ डिसेंबर,(प्रतिनिधी) – रंगमच तो शाळेचा असो वा चित्रपट मालिका, नाटकांचा असो, एकदा ॲक्शन, कॅमेरा, रोलिंग म्हटल की कलाकाराच्या उपजत कला त्यात बंदिस्त होतात. त्याच्या कलेतून त्याचे व्यक्तिमत्त्व घडते असे प्रतिपादन बाल अभिनेत्री मायरा वयकुल हिने माऊली सभागृहात तिची भावना डॉ. सुधा कांकरिया यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केली.
मराठवाडा मित्र मंडळ, मानकन्हैया ट्रस्टच्या राज्यस्तरीय कांकरिया करंडक बाल एकांकाकिका रौप्य महोत्सवी वर्षाच्या एकांकिका स्पर्धांचे उद्घाटन झी फेम तुझी माझी रेशीम गाठ मधील बाल अभिनेत्री मायरा वयकुल (परी) हीच्या हस्ते व अखिल भारतिय बालरंभूमीचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी आमदार संग्राम जगताप, क्षीतीज झावरे, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, स्वागताध्यक्ष डॉ. सुधा कांकरिया, सचिव सदाशिव मोहिते, परिक्षक सागर लोधी (पुणे) मिरा शेंडगे (सोलापूर) संजय पेंडसे (नागपूर) लेखक परिक्षक सदानंद भणगे उपस्थीत होते.
या वेळी प्रकाश कांकरिया यांनी मंडळाचा व कांकरिया करंडकचा २५ वर्षाचा इतिहास मांडला, हे वर्ष करंडकासाठी रौप्य मोहत्सवी असल्याने एक आगळावेगळा उपक्रम राबण्यास मनस्वी आनंद होत आहे. स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांनी २५ वर्षाचा गौरवशाली इतिहास सांगून यांदाचे रौप्य महोत्सवी वर्ष जल्लोष या बाबत भावना व्यक्त केल्या. आजवर पाचशेहून अधिक संघ व राज्यभरातील ८ हजार बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत राज्यातील बालरंगभूमीला वेगळी दिशा देण्याचे काम करीत आहे. यातून मालिका, चित्रपटात काम करणारी कलावंत हे कांकरिया करंडकच्या व्यासपीठावर घडल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगीतले. अखिल भारतीय बालरंगभूमीचे अध्यक्ष पारखी म्हणाले, बालवयात संस्कार महत्वाचे असतात. कांकरिया बाल एकांकिका महोत्सवातून गेली २५ वर्ष सातत्याने राज्यातील बाल कलाकारांवर संस्कार होत आहेत. बालरंगभूमीला मोठे बळ देण्याचे काम कांकरिया एकांकिका महोत्सवाने केले आहे.
आमदार जगताप म्हणाले, बालरंगभूमी ही निखळ आनंद देणारी, बालकांचे उज्वल भविष्य घडविणारी रंगभूमी आहे. गेल्या पंचवीस वर्षात कांकरिया करंडकने नगर मधील व राज्यातील बालकलाकारांची संस्कृती फुलवणारी प्रयोगशाळाच चालवत असल्याचे ते म्हणाले. मोठ्या संखेने बाल कलाकारानी गर्दी केली होती. आकर्षक प्रवेशद्वार, छोटा भीम, बालकृष्ण, तसेच वेगवेगळे पक्षी , प्राणी याने सभागृहचा परिसर सुशोभित झाला होता तसेच २५ वर्षाचा इतिहास सांगणारे विविध ५५० बाल कलाकारांच्या भावमुद्रा फोटो गैलरीद्वारे सादर केले आहे. तसेच विविध आकर्षक सेल्फी पॉइंट्स मुलांचे मन जिंकून जात आहे. आणि त्यातच ढोल ताशे आणि तुतारी द्वारे पाहुण्यांचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले.
सुरवातीस मनस्वी कोरडे हिने गणेश वंदना सादर केली तर अनंत जोशी व गौरी जोशी यांच्या मार्गदर्शना खाली 25 मुलांनी रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त बम बम बोले या गितावर बहरदार नृत्य सादर केले. आणि त्यावर मायरा ने ही सुंदर ताल धरला आणि सहभागी जाली. दिनांक ३०, ३१ डिसेबर आणि १ जानेवारी या ३ दिवसात २५ बाल एकांकिका सादर होत आहेत. प्रवेश मोफत आहे, तरी सर्व नगरकरानी या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ सुधा कांकरिया यानी केले आहे. नगर बाहेरच्या प्रेक्षकासाठी यु ट्यूब व फेसबुक वर लाइव होत आहे.
मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्टचे सदाशिव मोहिते, उमाकांत जांभळे, दत्ता इंगळे, शशिकांत नजान, डॉ. विजय जोशी, गौरी जोशी, नंदकुमार देशपांडे, सुभाष बागूल, मनोहर कटके, मोईनुद्दीन इनामदार, पुरूषोत्तम दरबस्सवार, डॉ. सुभाष बागले, रमेशचंद्र छाजेड़, रमेश बाफना, प्रिया सोनटक्के, नंदकुमार देशपांडे,रामदास केदार, गाणपतराव लोखंडे, दिपक शिरसूल यांच्यासह सर्व पदाधिकारी या रैप्य महोत्सवी एकांकिका स्पर्धेसाठी झटत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी तर आभार सदाशिव मोहिते यांनी मानले.