अहमदनगर,दि.१३ जानेवारी,(प्रतिनिधी)– शहरातील सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका ज्योती उमेश साठे यांना लोकशाहीर जन कल्याण सेवा समिती (नवी दिल्ली) यांच्या वतीने सावित्रीमायीची लेक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व गुरूव्दारा रकाबगंजसाहेब अध्यक्ष कुलविंदर सिंग यांच्या हस्ते साठे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जन कल्याण समितीचे अध्यक्षा प्रतिभा सोळसे, विक्रम सोळसे, राजेंद्र साळवे, उमेश साठे, ना.म. साठे आदी उपस्थित होते.
ज्योती साठे या महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा आहेत. त्या लेखिका, कथाकार, कवयित्री, साहित्यिक म्हणून कार्यरत असून, सामाजिक योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक व साहित्य कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी देखील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साठे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महालक्ष्मी महिला बचत गट व विविध क्षेत्रातील महिलांनी त्यांचे अभिनंदन केले.