अहमदनगर,दि.१५ मे, (प्रतिनिधी) – जिओ सिनेमाने आधी फिफा वर्ल्ड कप २०२२ आणि आता आयपीएल २०२३ या भव्य स्पर्धांचे थेट प्रक्षेपण युजर्सना मोफत पुरवल्याने आता प्रत्येक फोनमध्ये जिओ सिनेमा ॲप पोहोचलं आहे. ज्यानंतर फायनली आता जिओने आपली प्रीमियम सेवा भारतात लाँच केली आहे. नुकतच कंपनीने जिओ सिनेमा प्रीमियम लाँच केलं असून जिओ सिनेमा प्रीमियम अंतर्गत, ग्राहकांना स्टुडिओच्या खास कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स ही प्रसिद्ध सिरीज आतापर्यंत OTT वर उपलब्ध नव्हती जी आता जिओ सिनेमा Premium वर पाहायाला मिळणार असून जिओ सिनेमा ॲप Android आणि iOS दोन्हीमध्ये डाउनलोड करता येणार आहे.
जिओ सिनेमा प्रीमियमच्या सबस्क्रिप्शन प्लानची किंमत सध्या तरी ९९९ रुपये आहे. तुम्ही ही योजना कोणत्याही डिव्हाइसवर वापरु शकता. कंपनीने Jio सिनेमामध्ये हाय क्वॉलिटी व्हिडिओ आणि ऑडिओ असणार असा दावा केला आहे. तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतही ही योजना वापरु शकता. ही कंपनीची वार्षिक योजना आहे.
९९ रुपयांचा प्लॅन –
काही दिवसांपूर्वी जिओ सिनेमाचे गोल्ड, डेली आणि प्लॅटिनम प्लॅनही समोर आले होते. जिओ सिनेमा च्या प्रीमियम प्लानच्या किमती कंपनीने अजून जाहीर केलेल्या नाहीत. त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे परंतु काही सोशल मीडिया युजर्सनी सोशल मीडियावर जिओ सिनेमा Premium च्या किमती शेअर केल्या आहेत. जिओ सिनेमा Premium अंतर्गत तीन प्लॅन असतील, त्यापैकी गोल्ड प्लानची किंमत ९९ रुपये असेल आणि ती तीन महिन्यांसाठी वैध असेल. या योजनेअंतर्गत, तुम्ही दोन उपकरणांवर एक खाते वापरु शकता.
विषेश म्हणजे दररोज २ रुपयांची देखील एक योजना असण्याची चर्चा आहे.
महत्वाचे लेख
- राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावरील पथदिव्यांचे नूतनीकरण करा – राजेंद्र साळवे
- मनोरथ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टकडून डॉ.हळबे बालभवनास स्मार्ट टीव्हीची भेट
- जिल्हा सहकारी बँकेची नोकरभरती नियमानुसारच, बँके मार्फत प्रेस नोटने खुलासा
- या जिल्ह्यात आला टक्कल व्हायरस, ज्याने पडते तीन दिवसात टक्कल
- भारतीय सैन समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रमेश बनभेरू यांची नियुक्ती