जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात खेळाडूंचा सत्कार
अहमदनगर,दि.११ जानेवारी,(प्रतिनिधी) – जैन कॉन्फरन्स युवा शाखा (दिल्ली) आयोजित जैन कॉन्फरन्स युवा प्रेस्टीज लीग क्रिकेट टूर्नामेंट मध्ये बहुतांश शहरातील खेळाडूंचा सहभाग असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकाविले. नुकतीच ही क्रिकेट स्पर्धा इंदौर येथे पार पडली. विजेत्या संघातील खेळाडूंचा आनंद धाम परिसरात ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. खेळाडूंना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
जय आनंद फाऊंडेशनच्या वतीने विजयी संघाच्या खेळाडूंचा माजी नगरसेवक विपुल शेटीया व मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांनी सत्कार केला. तर खेळाडूंनी प.पू. श्री. आनंदऋषीजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी अनुज सोनीमंडलेचा, अमोल शिंगी, सचिन कटारिया, गौरव बोरा, गौतम मुथा, अनुराग मालू, निलेश भंडारी, निमेश राछ, ओजस बोरा, वैभव मेहेर, प्रशांत मुथा, अंकित कोठारी, भावेश जामगावकर आदींसह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
या टूर्नामेंट मध्ये दिल्ली, कर्नाटक, चेन्नई, राजस्थान, गुजरात, मुंबई, तामिळनाडू आदी देश भरातून आठ संघ सहभागी झाले होते. शहरातून जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्ष रोशन चोरडिया व महामंत्री पवन कटारिया यांच्या पुढाकाराने कर्णधार अनुपम संकलेचा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता. संघात रोहित जैन, सौरभ संकलेचा, आनंद चोपडा, आकाश मुनोत, मनोज चोपडा, यश कासलीवाल, रोहित चुत्तर, आनंद बलदोटा, अभिषेक कोठारी, कुशल कांकरिया, पार्थ बाफना, रोहित शिंगवी, रोशन चोरडिया, पवन कटारिया या खेळाडूंचा समावेश होता.
महाराष्ट्राच्या संघाने शेवट पर्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजयाची घौडदौड कायम राखली. अंतिम सामना मुंबई विभागाबरोबर झाला. यामध्ये महाराष्ट्र संघाने मुंबई विभागीय संघावर दणदणीत विजय मिळवून जैन कॉन्फरन्स युवा प्रेस्टीज लीग क्रिकेट टूर्नामेंटच्या चषकावर नाव कोरले व 1 लाख 1 हजार रुपयाचे बक्षिस पटकाविले आहे. या सर्व खेळाडूंचे शहरात अभिनंदन होत आहे.