Homeक्रीडाश्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा

हार्दिककडे टी 20 संघाचं कर्णधारपद, तर वन-डेमध्ये रोहित असणार कॅप्टन

अहमदनगर,दि.२७ डिसेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – टीम इंडियाच्या नववर्षाची सुरुवात ही श्रीलंका विरुद्ध होणार आहे. श्रीलंका भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India 2023) येणार आहे. श्रीलंका ही गत आशिया चॅम्पियन (Asia Cup Winner 2022) राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर श्रीलंकेचं मजबूत आव्हान असणार आहे. यामुळे टीम इंडिया नववर्षाची सुरुवात ही विजयाने करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. भारतीय संघ (Team India) 2023 वर्षांची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) नुकताच संघ जाहीर केला आहे. यावेळी टी20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे दिलं गेलं असून एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडेच आहे.

विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला टी20 संघाचा उपकर्णदार केलं असून बऱ्याच युवा खेळाडूंना टी20 संघात संधी दिली गेली आहे. याशिवाय रोहितसह विराट,श्रेयस अय्यर, केएल राहुल हे दिग्गज टी20 संघात नसून एकदिवसीय संघात आहेत. तर ऋषभ पंत हा दोन्ही संघात नसल्याचं दिसून येत आहे. तर नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया…

भारताचा टी20 संघ-

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

भारताचा एकदिवसीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक

टी20 मालिका-

पहिला टी20 सामना – दिनांक 3 जानेवारी, (स्थळ -वानखेडे स्टेडियम, मुंबई, वेळ सायंकाळी 7 वाजता)

दुसरा टी20 सामना– दिनांक 5 जानेवारी, (स्थळ – एमसीए स्टेडियम, पुणे, सायंकाळी 7 वाजता)

तिसरा टी20 सामना – दिनांक 7 जानेवारी, (स्थळ – सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, सायंकाळी 7 वाजता)

एकदिवसीय मालिका –

पहिला एकदिवसीय सामना – दिनांक 10 जानेवारी, (स्थळ – बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी, वेळ -दुपारी 2 वाजता)

दुसरा एकदिवसीय सामना – दिनांक 12 जानेवारी, (स्थळ – ईडन गार्डन्स, कोलकाता,वेळ – दुपारी 2 वाजता)

तिसरा एकदिवसीय सामना – दिनांक 15 जानेवारी,(स्थळ -ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम, वेळ -दुपारी 2 वाजता)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!