अहमदाबाद,दि.१ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने गुजरातीमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडची अवस्था लिंबूटिंबू टीमसारखी केली. भारतीय वेगवान गोलंदाजांच्या वादळात सापडलेल्या किवींची फलंदाजी पोलापोचोळ्यासारखी उडून गेली.
भारताच्या 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने तिसरा टी 20 सामना विक्रमी 168 धावांनी जिंकत मालिका विजयाची घोडदौड कायम राखली. भारताकडून फलंदाजीत शुभमन गिलने 63 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत हार्दिक पांड्याने 16 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 20 षटकात 4 बाद 234 धावा केल्या. भारताकडून शुभमन गिलने नाबाद 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपले पहिले वहिले टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. गिलने पूर्ण 20 षटके खेळली. त्याला राहुल त्रिपाठीने 44 तर हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 30 धावा करून चांगली साथ दिली. गिलने भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. त्याने 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या.