Homeमहाराष्ट्रपुढील पाच वर्षात पृथ्वीचं तापमान भयंकर वाढणार,WMo चा खुलासा

पुढील पाच वर्षात पृथ्वीचं तापमान भयंकर वाढणार,WMo चा खुलासा


मुंबई, १८ मे २०२३ – पुढील पाच वर्षात पृथ्वी वरील उष्णता अधिक वाढणार आहे. मानवाला पृथ्वीवर राहणं कठीण होणार आहे. यामागचं कारण म्हणजे पृथ्वीचे वाढणार तापमान आहे. जागतिक हवामान संघटनेने बुधवारी एक धक्कदायक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

यामध्ये सांगण्यात आले आहे की, येत्या पाच वर्षात संपूर्ण जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल. यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णताही वाढणार आहे.डब्लूएमओने ३० वर्षांच्या सरासरी जागतिक तापमानाच्या आधारे हा खुलासा केला आहे. २०२७ पर्यंत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याची ६६ टक्के शक्यता असल्याचंही संघटनेने म्हटले आहे.

ब्रिटनच्या मेट ऑफिस हॅडली सेंटरमधील लॉन्ग रेंज प्रेडिक्शन प्रमुख अॅडम स्कॅफे म्हणाले की, पुढील चार ते पाच वर्षांत आपल्याला उष्णतेची ऐतिहासिक विक्रमी पातळी पाहायला मिळू शकते. तापमान दीड अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकतो. गेल्या वर्षी आलेल्या अहवालात याची शक्यता ५०-५० होती. पण पुन्हा केलेल्या अभ्यासानुसार आता ही शक्यता ६६ टक्के इतकी झाली आहे. ज्या भयानक अहवालात ही गोष्ट उघड झाली आहे. त्याला ‘ग्लोबल अॅन्युअल टू डेकॅडल क्लायमेट अपडेट’, असे नाव देण्यात आले आहे.दर पाच वर्षांतील एक वर्ष अत्यंत उष्ण असतो

डब्लूएमओनेने आणखी एक चिंताजनक इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये पुढील पाच वर्षांत विक्रमी उष्माघात होण्याची ९८ टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१६ पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हे एक मोठे हवामान संकट आहे, ज्याला बहुतेक देश गांभीर्याने घेत नाहीत, असं डब्लूएमओचे म्हणणं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!