Homeनगर शहरकाश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडमध्ये नगरचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा ठरले अव्वल

काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईडमध्ये नगरचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा ठरले अव्वल

अहमदनगर,दि.१२ मार्च,(प्रतिनिधी) – शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा याने काश्मीर ते कन्याकुमारी 3 हजार 700 किलोमीटरच्या सायकल राईड साडेतेरा दिवसात पूर्ण केली. 189 तासात क्रॉस कंट्री सायकल राईड पूर्ण करणारे वधवा सर्व सायकलपटूंमध्ये अव्वल ठरले. जस्मितसिंह वधवा यांनी शनिवारी दि.25 फेब्रुवारी रोजी श्रीनगरच्या लाल चौकातून या राईडला प्रारंभ केले होते. 11 राज्यांना ओलांडून त्यांनी शुक्रवारी (दि.10 मार्च) दुपारी कन्याकुमारी गाठली. यामध्ये त्यांनी दिवसामधील 24 तासातून फक्त चार ते पाच तास विश्रांती घेतली. वधवा यांना ही राईड पूर्ण करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले.

श्रीनगर पटनी टॉप येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेले 9 कि.मी. चे दोन बोगदे पार करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष परवानगी देण्यात आली होती. या महामार्गावर फक्त चारचाकी वाहनांना परवानगी आहे. मात्र सायकपटूंना जाण्यासाठी काही वेळ वाहने थांबवून सायकल पटूंच्या मागे व पुढे एक वाहन ठेऊन त्यांना या राईडसाठी सहकार्य करण्यात आले. तर एका ठिकाणी काही स्थानिक गुंड प्रवृत्ती लोकांनी सायकलपटूंना अडवून दमबाजी केली. मात्र स्थानिक नागरिकांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा डाव हाणून पाडला व सायकपटूंना सहकार्य केले. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत करुन चहापानची व्यवस्था केली होती. अनेक युवक-युवतींनी सायकल पटूंना पाहून स्वत: सायकल चालविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सायकलपटू जस्मित वधवा यांनी दिली.

वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनच्या मान्यतेने दिल्ली रेन्डोनियर्सच्या वतीने ही डॉ. चिरो मित्रो यांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल राईड पार पडली. श्रीनगरमध्ये 0 अंश डिग्रीच्या नीचांक तापमान पासून सुरु झालेली सायकल राईड विविध टप्पे पार करुन कन्याकुमारी येथे 45 अंश डिग्रीच्या तापमानात शारीरिक क्षमतेचा कस लावणार्‍या या  सायकल राईडचा थरार सुरु होता. यामध्ये दररोज 300 कि.मी. पर्यंतचा प्रवास सायकलपटूंनी केला. यामध्ये तब्बल 12 सायकलपटू सहभागी झाले होते. शेवट पर्यंत 8 सायकलपटूंनी कन्याकुमारी पर्यंतचा टप्पा पार केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!