मुंबई,दि.१ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात काही घोषणा केल्या आहे. शैक्षणिक क्षेत्रातील काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले आहे. यात प्रामुख्याने 157 नर्सिंग महाविद्यालय सुरू केले जाणार असून त्याचबरोबर विविध टेक-ऑटो क्षेत्रातील घोषणा देखील केल्या आहे.
157 नवीन नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा आहे. मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट संस्था सुरू केल्या जातील. आगामी तीन वर्षात एकलव्य शाळांना 38 हजार 800 शिक्षक आणि कर्मचारी मिळणार आहे.
एक लाख प्राचीन पुरातन वास्तूंचे डिजिटलायजेन्स करण्याची घोषणा.
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 3 सेंटर्स ऑफ एक्सलन्स उघडली जातील.
नवोन्मेष आणि संशोधनासाठी नवीन राष्ट्रीय डेटा गव्हर्नन्स धोरण तयार केले जाईल.
पंचायत आणि प्रभाग स्तरावर भौतिक ग्रंथालये स्थापन करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्चला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून पाठिंबा दिला जाईल.
47 लाख तरुणांना राष्ट्रीय शिकाऊ पदोन्नती योजनेचा लाभ झाला.
30 स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय सेंटर्सची स्थापना केली जाईल.
टेक-ऑटो क्षेत्रातील मोठ्या घोषणा
ई-कोर्ट योजनेचा तिसरा टप्पा 7,000 कोटी रुपयांपासून सुरू होईल.
5G अॅप्स बनवण्यासाठी 100 लॅब बनवल्या जातील.
ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी 2030 पर्यंत 5 MMT वार्षिक उत्पादनाचे लक्ष्य.
ऊर्जा सुरक्षा क्षेत्रात 35 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक.
नवीन ऊर्जा क्षेत्रात 20 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक.
रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची भांडवली तरतूद.
मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल.
भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 3 उत्कृष्ट संस्था स्थापन केल्या जातील.
वाहन स्क्रॅपिंगसाठी पुरेशा निधीची तरतूद केली जाईल.
शेअर्स आणि लाभांशाचा दावा करण्यासाठी एकात्मिक IT पोर्टल तयार केले जाईल.