मुंबई, १७ मे २०२३ – पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी वेगवेगळ्या भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात यामुळे नेहमीच गर्दी असते. यात आषाढीच्या वेळी अधिक गर्दी असल्याने लवकर व चांगले दर्शन होण्यासाठी व्हीआयपी दर्शनाची सोय असते. याकरीता व्हीआयपी दर्शनाला शुल्क आकारण्याची मागणी वारकरी सांप्रदायाने केली आहे.
पंढरपूरात विठ्ठल– रूख्मीणीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. आषाढी यात्रेदरम्यान तर भाविकांचा जनसागरच लोटलेला असतो. यामुळे रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत असते. अशात गर्दीत लोटालोट होत असते. या गर्दीत न जाता विठ्ठलाचे दर्शन चांगल्या प्रकारे करता यावे; याकरीता व्हीआयपी रांगेची सुविधा आहे. परंतु, या रांगेतील भाविकाला व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क आकारावे; अशी मागणी केली आहे.
व्हीआयपी दर्शनासाठीचे शुल्क हे मंदिराच्या उत्पन्न वाढीसाठी आकारावे, अशी वारकरी सांप्रदायाने केलेली प्रमुख मागणी आहे. व्हीआयपी दर्शनाला शुल्क सुरू झाल्यास कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार असून या शुल्कातील रक्कमेतून भाविकांना सुविधा देण्याकडे मंदिर प्रशासनाचा कल असावा. व्हीआयपी सशुल्क दर्शनाबाबत वारकरी सेवा संघाच्या हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी मागणी केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा जोगदंड महाराजांनी म्हटले आहे.
विठ्ठल दर्शनासाठी वारकरी सांप्रदायाची मोठी मागणी
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on