हिंदुत्त्वादी नेते कालीचरण यांचा सहभाग
अहमदनगर,दि.१४ डिसेंबर,(प्रतिनिधी) – हिंदू जागरण मोर्चा व विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने लव्ह जिहाद कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी काढलेल्या मोर्चास मोठी गर्दी झाली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाची सुरूवात झाली. प्रखर हिंदुत्त्वादी नेते कालीचरण या मोर्चात सहभागी झाले होते. जुने बसस्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा माळीवाडा, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रस्त्यामार्गे दिल्लीगेट असा झाला.
मोर्चापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दुमदमून गेला. नगर शहराबरोबरच जिल्ह्यातून ग्रामीण भागातून अनेकांनी या मोर्चाला उपस्थिती दर्शविली. दिल्लीगेटजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाला मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. बंदोबस्तासाठी शहराबाहेरून पोलीस अधिकारी, कर्मचारी आले होते.