गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी, राहाता परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच नेवासा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाजवर्तवला होता. त्यानुसार, रविवारी नगर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार एन्ट्री झाली. वाऱ्यांचा प्रचंड वेग असल्यामुळे वाहन चालवणं तसंच रस्त्यावर थांबणं सुद्धा कठीण झाल होतं. या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने समोरासमोरील दृश्य दिसेनासे झाले होते.
या वादळीवादामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.