मुंबई, १३ मे २०२३ – राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची तीव्रतेत वाढ झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा हा ४० अंशाचा पार गेला आहे. पुणे वेधशाळेने १४ मे पर्यंत तापमानात वाढ होणार असल्याचे वर्तवले आहे. याचदरम्यान, नाशिक जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे.
यानंतर शेतकऱ्याला उपचारासाठी दाखल केलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलं. साहेबराव आव्हाड असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. तळपत्या उन्हात काम करत असताना उष्माघाताचा त्रास होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . नाशिकमध्ये दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे.
नागपूरात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे. शहरातील गोळीबार चौकात फुटपाथवर ४० वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळला आहे. राज्यातील अनेक नागरिक उन्ह्याच्या कडाक्यामुळे त्रस्त झाले आहे. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा चाळीशीच्या वर गेला आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भातही उष्णतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वाढल्याचे समोर आले आहे. पुणे वेध शाळेने १४ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे.
उष्णतेची लाट; राज्यात उष्माघातामुळे पहिला बळी
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on