मुंबई,दि.१७ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेले तीन दिवस सुप्रीम कोर्टात युक्तिवाद झाला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून तिन्ही दिवस युक्तिवाद करण्यात आला आहे.
या युक्तिवादात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले आहे. त्यानंतर आता सुप्रीम कोर्ट या प्रकरणी महत्त्वाचा निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढी ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी पासून होणार आहे.
सत्ता संघर्षाचं हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार का ? याबाबत आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे गेले तर सुनावणी आणखी लांबणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सध्या हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच सुनावणीसाठी असणार आहे.
सत्तासंघर्षावर सुनावणी पुढे ढकलली, ‘या’ तारखेला सुनावणी
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on