Homeनगर शहरइलाक्षी ह्युंदाई मध्ये ग्रैंड आय 10 निओसचे अनावरण

इलाक्षी ह्युंदाई मध्ये ग्रैंड आय 10 निओसचे अनावरण

अहमदनगर,दि.२९ जानेवारी,(प्रतिनिधी) – शहरातील ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर असलेल्या इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये ग्रैंड आय 10 निओस या नवीन कारचे अनावरण करण्यात आले. विक्री पश्‍चात सर्वोत्तम सेवा देणार्‍या व ग्राहकांची प्रथम पसंती असलेल्या ह्युंदाई कंपनीची अद्यावत सुविधांनी युक्त नवीन ग्रैंड आय 10 निओस कार प्रेमींना आकर्षित करत आहे.

या कारचे अनावरण मोटार वाहन निरीक्षक अमृता वांडेकर व जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांच्या हस्ते झाले. शोरूमचे संचालक विजय कुमार गडाख याच्या मागदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वाहनात अत्यंत वाजवी दरात ग्राहकांना महागड्या कारमध्ये असलेल्या सेगमेंटच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
नवीन ग्रैंड आय 10 निओस मध्ये 20.25 टच स्क्रीन ए.व्ही.एन., स्मार्ट फोन कनेक्टिव्हीटी (अ‍ॅपल कार प्ले, अ‍ॅनरॉईड) ऑटो व मीरर लिंक), स्टायलिश डीआरएलएस, स्टायलिश ग्रिल्सा, क्रुझ कंट्रोल, सुपीरिअर एसी परफॉर्मन्स, इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अन लॉक, रिअर पार्किंग कॅमेरा, फुटवॉल लायटिंग, ईको कोटिंग टेकनोलॉजी (ज्याद्वारे गाडीत गंध विरहीत स्वच्छ व खेळती हवा मिळते), 4 सिलेंडर इंजिन पेट्रोल+सीएनजी 1.2 ली/पेट्रोल 1.2 ली, 3 वर्षे अनलिमिटेड किलोमीटर, 3 वर्षे फ्री रोड असिस्टंट, लो कॉस्ट ऑफ मेन्टेनन्स व सहा एअर बॅगची सुविधा देण्यात आली आहे.

तसेच सदर गाडीमध्ये 1.0 लीटर व 1.2 लीटर मॅन्युअल व ऑटोमॅटिक सह इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. या गाडीमध्ये स्पर्धात्मक कंपन्यांच्या तुलनेत 45 पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहेत. सदर गाडी पेट्रोल मॅन्युअल 3 व्हेरिएन्ट व दोन व्हेरिएन्ट मध्ये तसेच सहा आकर्षक रंगात उपलब्ध होणार आहे. सदर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएन्ट गाडीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख ते 7.92 लाख रुपये दरम्यान राहणार आहे. आकर्षक एक्सचेंज ऑफर तसेच नामांकित बँकेचे फायनान्स सुविधा शोरुममध्ये उपलब्ध असल्याची माहिती सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी दिली. सदर गाडी ईलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी शोरूमला भेट देण्याचे आवाहन जनरल राजू बेजगमवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!