अहिल्यानगर,(प्रतिनिधी) – मनोरथ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ.हळबे बालभवनात मुलांना ई लर्निंग शिक्षण देण्यासाठी एल ई डी 32 इंची स्मार्ट टीव्ही भेट म्हणून देण्यात आला. या टीव्हीमुळे भवनातील मुलांना हसत खेळत शिक्षण मिळावे व मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होण्याकरिता निश्चितच मदत होणार आहे.
आजच्या या कार्यक्रमास मनोरथ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मनिषाताई भिंगारदिवे, ॲड.नरेंद्र भिंगारदिवे, शिवा वाघमारे, नंदाताई बडे, संगीता भालेराव, मंदाताई लोखंडे, डॉ.रॉबिन तडसे, राम लोंढे, ॲड.अर्पणा देवतरसे, ॲड.अर्पिता मिसाळ आदीं मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंबादास पोटे यांनी सर्वांची ओळख करून दिली. उपस्थितीत सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सौ. उषा मॅडम यांनी बालभवन प्रकल्प व त्याचे ध्येय उद्दिष्ट कामाची रूपरेषा नमूद केली.
सौ.दिपाली मॅडम यांनी पी.एम.वाय प्रकल्पांचे ध्येय व उद्दिष्टे व कामाची रूपरेषा सांगितली.
अनेक दिवसापासून ज्या क्षणाची आतुरतेने मुले वाट पाहत होते, तो दिवस उगवला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मुलांनी व डॉ.हळबे बालभवन स्टाफने स्वप्नं पूर्ण झाल्याचे मत व्यक्त केले. आजचा हा कार्यक्रम अगदी आनंदमय वातावरणात पार पडला. नरेंद्र भिंगारदिवे यांनी सांगितले की, बालभवनासाठी भविष्यात मदत करण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ.शारदा मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. मुलांना पाहुण्यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला.