झाशी,दि.१४ एप्रिल २०२३ – यूपी एसटीएफने माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद याचा झाशीत एन्काउंटर झाला आहे. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यापासून तो फरार झाला होता. पोलिस सतत त्यांचा शोध घेत होते आणि झाशी येथे त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले.
माफियातून राजकारणी झालेला अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात फरार होते. त्यांच्यावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशी येथे ही चकमक झाली असून त्यांच्याकडून विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
उमेश पाल बसपा आमदार राजू पाल यांच्या खून प्रकरणातील साक्षीदार होते. 24 फेब्रुवारीला न्यायालयातून घरी परतत असताना त्यांच्या घरासमोर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी अनेक गोळ्या उमेश पाल यांच्यावर झाडल्या आहे.
गँगस्टर अतिकचा मुलगा असदचे झाशीत एन्काउंटर
Recent Comments
Hello world!
on